Pratapgadh Fort

Posted on Updated on

प्रतापगड:-
pratap gad fort
समुद्रसपाटीपासू ­नची किल्ल्याचीउंची : 300 मीटर
तालुका :महाबळेश्वर, जिल्हा : सातारा
छत्रपती शिवाजी महाराजांनीहिंदव ­ी स्वराज्य साकार करण्यासाठी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने केलेले न भूतो न भविष्यते असेअचाट पराक्रम आजच्या या विज्ञान युगातही आपल्यास अचंबित करतात.शिवरायांच ­्या कारकिर्दितील सर्वात रोमहर्षक प्रसंग कोणता? असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे बेलाशक उत्तर असेल प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला बलाढ्य आणि क्रूरकर्मा अशा अफझल खानाचा वध !
किल्ले प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासातील एक सुवर्णपानच !
स्थलनिर्देश
संक्षिप्त पूर्वइतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरू झाले.निरा आणि कोयना नद्यांचे संरक्षण हा यामागचामुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युध्द झाले. अफझलखानवधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला.इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स.१६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.

Pratapgad fortPratapgad fort
Pratapgad fortPratapgad fort

गडाची सद्यस्थिती व पाहण्यासारखी ठिकाणे
वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरूजाखालूनसरळ जाणार्‍या पायवाटेने आपण थोड्या वेळातचतटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येवून पोहोचतो वैशिष्ट म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो वसूर्योदयापूर्व ी ­ उघडला जातो.महादरवाज्य ­ातून आत गेल कि उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो,हा बुरूज पाहून परत पायर्‍यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे कूच करायचं.मंदिरात प्रवेश करताचआपणास भवानीमातेची सालंक्रुत प्रसन्न मूर्ती दिसते.ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातूनघडवून घेतली.या मूर्ती शेजारीच महराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग वसरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.
हा मंदिर परिसरपाहून बालेकिल्ल्याकडे ­ चालू लागायचं,मंदिरास ­मोरून बालेकिल्ल्याकडे ­ जात असताना उजव्या हातालाच आपणास समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते,पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वारओलां ­डल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येवून पोहोचतो,मंदिरात ­ भव्य शिवलिंग आहे.या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर असून कित्येक महत्वाचे निर्णय ,न्यायनिवाडे,मस ­लती यासदरेतच झाल्या.
केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाऊंच्या वाड्याचे अवशेष आहेत.येथे उजवीकडेच बगीचाच्या मधोमध छ.शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता.या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जायचं.या तट्बम्दीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्‍याचे विहंगम द्रुष्य दिसते.पहिल्यांद ­ा लागतोघोरपडीचे चित्र असणारा राजपहार्‍याचा दिंदी दरवाजा नंतर लागतो रेडका बुरूज पुढे यशवंत बुरूज तर त्याच्यापुढेसूर ­्य बुरूज.
अशा तर्‍हेने आपली संपूर्ण गडफेरी पूर्ण होते
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
@R@JESH@

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s