चला कुणकेश्वराला, कोँकणकाशीला..

Posted on Updated on

मित्रहो श्रावण म्हणजे आपल्या सर्वाँचा आवडीचा महीना. सणा-सुदीचा हा महीना, पावसाने रिमझीम करुन धरतीला भिजवलेले असते, ऊन पावसाचा लपंडाव चालू असतो, शेतामध्ये शिवारं डोलत असतात. एकंदरीत झाडा झुडपांची हिरवी चादरच धरतीवर पसरलेली असते. अशा या मन प्रसन्न करणाय्रा श्रावण महीन्यातील सोमवारी श्री शंकराचे दर्शन हे अतीशय पवित्र मानले जाते. त्यामुळे ठिकठिकाणी शिवालयांमध्ये भाविक या सोमवारी गर्दी करतात. कोँकणातील काशी या नावाने प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर गावी श्रावणी सोमवार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रावणी सोमवारच्या निमीत्ताने येथे छोटेखानी जत्राच भरत असते. हजारो भाविक कुणकेश्वराच्या दर्शनासाठी ठिकठिकाणाहून येतात. शाळा कॉलेज मधील मुले तर या श्रावणी सोमवारी वन डे पिकनिकसाठी कुणकेश्वरला आवर्जुन भेट देतात. आता श्रावण महीना अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपल्यामुळे सध्या शाळा कॉलेज मध्ये तरुणाईचे कुणकेश्वर पिकनिकसाठी विविध प्लँनस् आखले जात आहेत. श्रावणातल्या कोणत्या सोमवारी जायचे, कुणकेश्वरला चालत जायचे की एस्.टी. ने, ईत्यादी प्लँनस् तरुणाई आखत असते. तरुण मुले खास करुन कुणकेश्वरला पायी चालत जाणेच पसंद करतात. होडीने तारामुंबरी खाडी ओलांडून नंतर मिठमुंबरी समुद्रकिनाय्राने पावसाच्या सरी अंगावर झेलत आणि कीनाय्रावर येणाय्रा लाटांशी खेळत कुणकेश्वरला जाण्याची मजाच काही और असते. हि मजा शब्दात मांडणे अशक्य! तुम्ही स्वतः जेव्हा अनुभव घ्याल तेव्हाच आपणास समजेल. आपल्यापैकी काही जणांनी आपल्या कॉलेज जिवनात हा अनुभव घेतला देखील असेल. असो…! पुढे डोँगराची चढण चढून कुणकेश्वरला गेल्यावर अगदी सायंकाळपर्यँत येथे ही तरुणाई ठाण मांडून असते. प्रथम श्री कुणकेश्वराचे दर्शन, त्यानंतर किनाय्रावर वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळणे, समुद्रात मनसोक्त आंघोळ करणे, त्यात फोटोसेशन हे आलेच. त्यानंतर एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन पदार्थाँवर आडवा हात मारल्यावर ही तरुणाई एस्.टी. महामंडळ झिँदाबाद म्हणत एस्.टी. ने तालुक्याच्या ठिकाणी परत निघुन जाते. आपणासही अशा पावसातील पिकनिकची मजा लुटायची आहे का? श्रावणसरी अंगावर झेलायच्या आहेत का? धार्मीक, नैसर्गिक, ऐतिहासिक सौँदर्य एकत्रितपणे पहायचे आहे का? तर मग श्रावण महीन्यातील कोणताही एक सोमवार फिक्स करा आणि कुणकेश्वर पिकनिक एन्जॉय करा. पण एन्जॉय करताना कुणकेश्वरच्या धार्मीकतेला बाधा पोहोचणार नाही याची दक्षता जरुर घ्या.

kukneshwar
kukneshwar
kukneshwar
यावर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार येत असून . तर मग यावर्षी श्रावणात येताय ना कुणकेश्वरला..?
Jay KunkeshwarJay Kunkeshwar
Jay KunkeshwarJay Kunkeshwar
Information from :Jay Kunkeshwar
Kunkeshwar 1 Kunkeshwar 2 Kunkeshwar 3 Kunkeshwar 4
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s