कांदाटी विकास संघ

Posted on Updated on

कोयना धरण बांधले गेले…

kandati khore
kandati khore

धरणाच्या पाण्यावर वीज तयार होऊ लागली अन महाराष्ट्रा सहित इत्तर राज्ये या विजेतून उजळून निघाली, धरणी सुजलाम सुफलाम झाली, आणि असे होत असताना मात्र आमच्या कांदाटीतील शेतकरी बांधवांची शेकडो एकर शेती कोयनेच्या पाण्या खाली गेली, दळणवळणाचे सर्व मार्ग बंद झाले …आणि मग कांदाटीतील बऱ्याच गावांचे पुनर्वसन झाले…. आणि शेतीच्या बदल्यात मिळाले काय तर …. दुष्काळी भागात शेती …स्वातंत्र्याची १०० वर्ष उलटली तरीसुद्धा सुद्धा या दुर्गम भागात आदिवाशींचे जीने जगावे लागत आहें……. जवळजवळ ५० वर्ष्याच्या प्रतीक्षेनंतर प्रशासनाला जाग आली.. आणि प्रशासनाला असा शोध लागला की कांदातीत सुद्धा माणसं राहतात. आणि या शोधानंतर एस. टी. ची सेवा सुरु झाली.

  •  वाघोबाच्या नावाने माणसांना उद्‌ध्वस्त करू नका
  • व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटी रद्द करा
  • धरणांमुळे बाधित झालेल्या धरणग्रस्तांना अभयरण्यामुळे पुन्हा बाधा झाली आणि आता व्याघ्र प्रकल्पामुळे बाधित होण्याची शक्यता आहे. व्याघ्र प्रकल्प होण्यास कोणाचा विरोध नाही परंतु अकारण त्रासदायक नियम बदलून जननियंत्रण सुलभ करण्याचा प्रस्ताव शासनाने स्वीकारावा
  • कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य उद्दिष्टांना धक्का न लावता जंगल संवर्धन आणि वाघ व इतर जंगली जीवांचे रक्षण, संवर्धन, जननियंत्रित पध्दतीने व्हावे
  • कोयना अभयारण्याचा निर्णय 1985 मध्ये झाला. तेव्हापासून आजवर वन किंवा वन्यजीव विभागाने नागरिकांना त्रास होईल अशी कृती कधीही केलेली नाही. प्रस्तावित सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटी रद्द झाल्या नाहीत, तरच आमचा व्याघ्र प्रकल्पाला विरोध आहे. जाचक अटी रद्द झाल्या, नागरिकांना त्रास होणार नसेल तर व्याघ्र प्रकल्पाला विरोध असण्याचा प्रश्‍नच नाही.
  • कोयना धरणांतर्गत असलेली पाच गावे व चांदोली अभयारण्यातील तीन गावे वगळता अन्य गावे उठविली जाणार नाहीत. विकासकामे व नागरी सुविधांना कोणताही अडथळा होणार नाही. बफर झोनमधील गावांना विकासासाठी वनखात्याचा निधी मिळणार आहे. केवळ व्यापारी तत्त्वावरील उद्योगांना विरोध होणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटी रद्द व्हाव्यात, सामान्य नागरिक व गावांच्या विकासाला विरोध होऊ नये, ही आमची भूमिका आहे. जाचक अटी शिथिल झाल्यास आमचा व्याघ्र प्रकल्पाला विरोध नाही
  • “कोयना अभयारण्याची बंधने जनतेसाठी त्रासदायक आहेत. येथील जनतेचा अभयारण्य किंवा व्याघ्र प्रकल्पाला विरोध नाही. मात्र, यापूर्वी अनेक संकटांना सामोरे जाणाऱ्या जनतेला अन्याय सहन करावा लागला आहे. पुनर्वसित ठिकाणी अन्याय झाल्याने अनेक प्रकल्पग्रस्त पुन्हा तालुक्‍यात राहायला आले आहेत. त्यामुळे अभयारण्याच्या नावाखाली जनतेवर जाचक अटी लादल्यास लोकशाही मार्गाने संघर्ष करणार आहे. 1998 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. लोकवस्ती असलेली गावे व परिसर अभयारण्यातून वगळला पाहिजे. कोयना धरणग्रस्त आजही चटके सोसत आहेत.’
  • या प्रकल्पाला आमचा विरोध नाही; पण वाघांचे रक्षण करताना लाखो मानव त्यांच्या घरादारांसह भक्ष्यस्थानी पडणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी
  • अभयारण्यातून वृक्ष वाढवणे आणि व्याघ्र प्रकल्पातून प्राणी वाढवणे हा शासनाचा उद्देश आहे. या प्रक्रियेत त्यांना माणूस नको आहे. असे संवर्धन वन विभाग अस्तित्वात आल्यापासून जंगलांचे नुकसान झाले आहे. पूर्वी जंगले चांगली होती , त्यात लोक राहत होते. गेल्या काही वर्षात ठेकेदारांमुळे जंगलांचे नुकसान झाले आहे. जंगलात राहणारे लोक जंगलाचे नुकसान करीत नाहीत. वन विभागाचे गार्ड किती संरक्षण करणार ? लोकजंगल संकल्पनेत हजारो लोक जंगलाचे संरक्षण करतील. ते झाडांची आणि प्राण्यांची संख्याही वाढवतील. तेथील ग्रामसभांना यासंबंधीचे अधिकार द्यावेनिसर्गव्यवस्थेलाच सुरुंग लावणारे आहे.

दुसऱ्याचे विचार कॉपी पेस्ट करून स्वताच्या नावाचे नवीन व्यासपीठ करताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल या अश्याच प्रकारामुळे आपली माणसे विभागली गेली आहेत. आणि तुम्ही सुद्धा तेच करत आहात… तुम्ही जर तुमचे स्वतः चे विचार मांडून जर समाजसेवेचे किंवा समाजप्रबोधनाचे काम करत असाल तर नक्कीच तुमच्या मागे फौज उभी राहील…परंतु दुसऱ्याचे विचार कॉपी पेस्ट करून स्वताचे व्यासपीठ तयार करण्याच्या मोहापायी आपण तीच चूक पुन्हा करत आहात असे आपणास वाटत नाही का ???
तुमचे स्वतः चे मत असेल भले ते चुकीचे असो किंवा बरोबर एकच व्यासपीठावर मांडून त्यातून चर्चा घडवून आणूया, यातूनच लोकांच्या विचारांना खाद्य आणि गती मिळेल आणि यातूनच प्रश्नांना वाचा फुटून कदाचित आपल्याला मार्ग सापडेल….
अजून मला या ठिकाणी थोडक्यात नमूद करावेसे वाटते ते असे कि, आम्ही सुद्धा या ठिकाणी कोणत्याही वयक्तिक नावाचा उल्लेख केलेला नाही तो यासाठी कि… बऱ्याच लोकांचा असा समज आसतो कि, हि व्यक्ती फक्त नावासाठी हे सर्व काम करत आहे …. परंतु आमचे फक्त एकच उद्देश आहे तो म्हणजे जो काही आपला कांदाटी खोऱ्यातील समाज वेगवेगळ्या ठिकाणी आपसातील गैरसमजामुळे विखुरलेला आहे… त्या समाजाला एकसंध बांधून ठेवायचे काम आपल्या नवीन पिढीला करायचे आहे.
तात्पर्य : आंधळ्याला डोळे दान करता येतील पण दृष्टी नाही …

सर्व प्रथम या मंचावर आपले स्वागत आहे …. एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आपल्या जास्तीत जास्त मित्रांना कळवा… आणि या कट्ट्यावर चर्चेला बोलवा …. एकत्र या …..धन्यवाद .\

Refernce from:Kandati Khore click to visit

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s