Mahabaleshwar Madhe Gulabi Thandi

Posted on Updated on

Mahableshwar gulabi thandi
Mahableshwar gulabi thandi

महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचे आगमन

महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. महाराष्ट्राचा काश्मीर म्हणूनही महाबळेश्वरला संबोधले जाते. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश-विदेश पातळीवर लौकिकास आले आहे. म्हणूनच येथे बाराही महिने पर्यटकांची वर्दळ असते.

उत्तर महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये महाबळेश्वर आणि माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणांशी साधम्र्य साधणाऱ्या वातावरणाची निर्मिती झाली अन् सर्वसामान्यांना सुखद धक्का बसला. डिसेंबरच्या प्रारंभी या स्वरूपाचा अनुभव मिळाला असला तरी तापमान कमी होण्याची प्रक्रिया तेव्हा एका विशिष्ट पातळीपर्यंत सिमीत राहिली होती. मुळात, थंडीची लाट उत्तर महाराष्ट्रास नवीन नाही, पण तिचे दरवर्षी नव्याने होणारे आगमन सर्वसामान्यांना हवेहवेसे वाटत असते. या वर्षी हंगामाच्या अगदी प्रारंभी दाखल झालेली थंडी मध्यंतरी १५ ते २० दिवस अंतर्धान पावली होती. त्यानंतर तिचे पुनरागमन झाले, ते थेट डिसेंबरच्या अखेरच्या दिवसात. यावेळी मात्र तिचा मुक्काम कायम राहील अशी स्थिती होती. उत्तरेकडील भागात थंडीची तीव्रता वाढल्याने त्याचा परिणाम साहजिकच उत्तर महाराष्ट्रावर झाला.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s