सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

Posted on Updated on

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा आराखडा करताना लोकांना विश्वासात घेणारऐक्य समूहSaturday, December 22, 2012 AT 11:18 AM (IST)Tags: mn3नागपूर, दि. 21 (प्रतिनिधी) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसराचा आराखडा तयार करताना स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींना विश्र्वासात घेतले जाईल, असे आश्र्वासन वन राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. विक्रमसिंह पाटणकर व अन्य सदस्यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर सुमारे 600 चौ.मी. क्षेत्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होत आहे. या प्रकल्पाच्या भोवतीचे 565 कि.मी. बफर झोन राहणार आहे. या बफर झोनमधील 85 गावांवर अनेक बंधने येणार असल्याने या प्रकल्पाला विरोध होत आहे. या संदर्भात विक्रमसिंह पाटणकर, शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले व मानसिंगराव नाईक यांनी आज एका लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना वन राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींना विश्र्वासात घेऊनच व्याघ्र संवर्धन प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येईल असे आश्र्वासन दिले. व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात 62 तर बफर क्षेत्रात 81 गावांचा समावेश आहे. व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन केंद्राच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अखत्यारित येते. त्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार प्रकल्पाचा आराखडा तयार करणे बंधनकारक असले तरी सर्वांना विश्र्वासात घेऊनच हे काम केले जाईल, असे आश्र्वासन भास्कर जाधव यांनी दिले.

Sahyadricha Waagh
Sahyadricha Waagh

Government says:-

आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यास राज्याचे नाव देश पातळीवर उंचावण्यास मदत होईल. पश्चिम महाराष्ट्राला नैसर्गिक देणगी लाभलेला सह्याद्री पर्वतरांगांचा प्रदेश म्हणजे साक्षात हिमालयाचेच छोटे रूप!

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने २४ जुलैला बफर झोन घोषित न करणाऱ्या देशातील पाच व्याघ्र प्रकल्पांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड घोषित केला होता. त्यात महाराष्ट्रातीलसह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा समावेश होता.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुख्यालय कराडमध्ये

कोयना व चांदोली अभयारण्याच्या क्षेत्रातील चार जिल्ह्यांच्या हद्दीत साकारणारा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून , या प्रकल्पाचे मुख्य कार्यालय कराडला झाले आहे. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून , येथील आगाशिवनगरातील वन खात्याच्या कार्यालयात व्याघ्र प्रकल्पाचे कार्यालयीन काम सुरू झाले आहे. वन विभाग व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयासाठी स्वतंत्र जागा शोधत असून , जागा मिळताच तेथे प्रशस्त कार्यालय उभे राहील , असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

कोयना व चांदोली अभयारण्याच्या क्षेत्रात चार जिल्ह्यांच्या सीमेवर साकारणारा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून , प्रकल्पात महत्वपूर्ण भूमिका बजावणारी स्थानिक सल्लागार समिताही सरकारने स्थापन केली आहे. राज्य सरकार या महिनाअखेरपर्यंत व्याघ्र संवर्धन आराखडा केंद्राच्या व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर करणार असून , या पार्श्वभूमीवर स्थानिक सल्लागार समितीची महत्वपूर्ण बैठक होत आहे.
देशातील एकोणचाळीसावा तर राज्यातील चौथा व्याघ्र प्रकल्प म्हणून येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणा ५ जानेवारी २०१० रोजी करण्यात आली होती. सह्याद्री पर्वत रागांच्या पश्चिम घाटातील सातारा , सांगली , कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमारेषांवर सुमारे ७४० चौरस किलोमीटरमध्ये राज्य सरकारने व्याघ्र प्रकल्पात वन पर्यटन वाढीस लागावे या उद्देशाने आराखडा तयार केल्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होणार आहे. त्या दृष्टीने व्याघ्र प्रकल्पाची स्थानिक सल्लागार समिती गठित केली असून , पुण्याचे विभागीय आयुक्त समितीचे उध्यक्ष आहेत , तर पाटणचे आमदार विक्रमसिंह पाटणकर , वाईचे मकरंद पाटील , सातारचे शिवेंद्रसिंहराजे भोसले , शिराळ्याचे मानसिंगराव नाईक , वारणेचे विनय कोरे या समितीचे सदस्य आहेत.
साताऱ्याहून रोहन भाटे , सांगलीहून अजित पाटील , कोल्हापूरहून रमण कुलकर्णी व रत्नागिरीहून सिद्धेश्वर देसले यांची सल्लागार समितीत नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s